Sunday, January 6, 2019

Junior Engineer vacancies in PWD, Maharashtra State

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत राज्यस्तरीय पदभरती जाहिरात २०१९
महाराष्ट्र शासनाने अधीक्षक अभियंता सा. बां. मंडळ मुंबई यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत या संवर्गाची रिक्त पदे प्रकल्प व्यवस्थापक, महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेने भरण्यात येणार आहेत.
पदनाम : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रीत)
वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु. ४३००/-)
उपलब्ध पदसंख्या (एकूण पदे ): ४०५
पात्रता:
शैक्षणिक व तांत्रिक अर्हता :
शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही धारण केलेली अर्हता
(शासन सा. बां. विभाग राजपत्र कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सेवाप्रवेश नियम दिनांक १ जानेवारी १९९८)
वयोमर्यादा  :
खुला/सर्वसाधारण प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय : १८ ते ४३ वर्षे
अपंग : १८ ते ४५ वर्षे
खेळाडू : ५ वर्षे सवलत (खुला प्रवर्ग ३८+५, मागासवर्ग ४३)
सामाजिक आरक्षण व टक्केवारी, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे स्वरूप याची माहिती वरील व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
महापरिक्षा पोर्टल:  https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage


Maharastra State Government has started filling vacancies in various department. The Public Work Department (PWD), Maharashtra has invited online applications to recruit its new staff. The current post is of Junior Engineer (Civil). The candidates having completed Diploma in Civil Engineering or related disciplines may apply for this post of Junior Engineer Civil in PWD Department, State of Maharashtra.
The candidates can only apply through an online portal called Mahapariksha Portal. The exam will be of online nature and will objective, a multiple choice question paper.
The salary is good and since the Maharashtra Government has declered to apply Seventh Pay commission on Jan 1, 2019, the salary will be satisfactory.

Saturday, December 29, 2018

Soil and Water Conservation Department Exam 2019

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत राज्यस्तरीय पदभरती जाहिरात २०१८


महाराष्ट्र शासनाने आयुक्त, मृद व जलसंधारण, वाल्मी परिसर, औरंगाबाद यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानुसार जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब अराजपत्रीत या संवर्गाची रिक्त पदे प्रकल्प व्यवस्थापक, महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेने भरण्यात आहेत.

पदनाम : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रीत)
वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु. ४३००/-)
उपलब्ध पदसंख्या (एकूण पदे ): २८२

पात्रता:
शैक्षणिक व तांत्रिक अर्हता :
शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा तिच्याशी समतुल्य अर्हता यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून / महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनामार्फत घेण्यात येणाऱ्या खालील प्रमाणे पदविका (कालावधी - ३ वर्षे)

  • १. सिव्हिल व रूरल इंजिनीरिंग मधील पदविका 
  • २. सिविल इंजिनीरिंग आणि रूरल कंस्ट्रक्शन मधील पदविका 
  • ३. ट्रान्स्पोर्टेशन इंजिनीरिंग मधील पदविका 
  • ४. कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविका


वयोमर्यादा  : 

  • खुला/सर्वसाधारण प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे 
  • मागासवर्गीय : १८ ते ४३ वर्षे 
  • अपंग : १८ ते ४५ वर्षे 
  • खेळाडू : ५ वर्षे सवलत (खुला प्रवर्ग ३८+५, मागासवर्ग ४३)


सामाजिक आरक्षण व टक्केवारी, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे स्वरूप याची माहिती वरील व्हिडिओमध्ये दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage


Popular Posts